सिकंदर चे भारतावरील आक्रमण
भारतात पासून सुमारे 6000 अंतरावर असलेल्या युगाना म्हणजे ग्रीक च्या ईशान्य भागात असलेल्या मिस डोनिया या प्रांतावर इसवीसन पूर्व 359 मध्ये राजा फिलिप द्वितीय या पराक्रमी राजाची सत्ता होती हा राजा कुशल आणि महत्वकांशी असा सेना नायक होता त्याच्या सैन्यात असंख्य वीर पराक्रमी सरदारांचा समावेश होता ज्याच्या सहकार्याने तो विशाल साम्राज्य निर्मितीची महत्त्वाकांक्षा बाळगून होतात त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे सिकंदर नागरिक विचारवंताच्या मार्गदर्शनाखाली राजनीती आणि युद्ध कलेचे सर्वोत्तम प्रशिक्षण दिले होते
त्यामुळे लहानपणापासूनच सिकंदर मध्ये एका उत्कृष्ट राज्यकर्त्याचे सर्व गुण दिसू लागले होते इसवी सन पूर्व 336 मध्ये अचानक राजा फिलीप याची हत्या झाली व वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी सिकंदर वर मिस डोनिया राज्याच्या राजकारभाराची जबाबदारी आली
इमेज
गादीवर बसतात सिकंदरने फारसी अत्याचाराच्या विरोधात ग्रीक वासियांना यांना प्रेरित केले आणि अल्पावधीतच ग्रीक लोकांचे हजारो पायदळ आणि घोडदळ सिकंदरच्या पाठीशी उभे राहिले इसवी सन पूर्व 334 मध्ये सिकंदरने फारशी भागाच्या पूर्व भागावर हल्ला चढवला त्याच्या विश्व विजयाच्या मोहिमेला सुरुवात झाली त्याकाळी फारसी सैन्याची जगात सर्वात शक्तिशाली सेना अशी ओळख होती परंतु असे असले तरी सिकंदरच्या अद्भुत युद्धनीतीने फारसी सेनेची दाना दान उडवली
इसवी सन पूर्व 334 ते इसवी सन पूर्व 330 या चार वर्षाच्या कालावधीत सिकंदर नावाच्या वादळाने पारस मध्ये असे काही थैमान घातले की फारसी सेनेने त्याच्यासमोर गुडघे टेकले इसवी सन पूर्व 330 च्या अरबेला च्या युद्धात फारसी सम्राट दारातृतीय याला पराभूत करून सिकंदरने फारसे साम्राज्यावर आपले अधिपत्य स्थापित केले
इमेज
आता सिकंदरच्या हाती ग्रीक सोबत एशिया मायनर मिश्र अफगाणिस्तान अशा मोठ्या साम्राज्याची सत्ता होती आता त्याचे पुढे लक्ष होते जगाच्या शेवटचे टोक म्हणजे भारत इसवी सन 326 मध्ये खैबर खिंडीच्या रस्त्याने हिंदुकुश पर्वताला पार करून सिकंदरने आपल्या विशाल सेने सोबत भारतात पहिले पाऊल टाकले
इमेज
भारतात पोहोचताच येथील लहान मोठ्या जनजातींनी सिकंदरच्या सेनेला त्रस्त करून सोडले परंतु लवकरच सिकंदरने त्यांच्यावर नियंत्रण मिळवले त्याकाळी भारतीय सीमा वरतीय भागात अश्वक नावाचे एक छोटे गणतंत्र होते त्याच्या राजधानीचे नाव मस्सक होते या राज्यावर ताबा मिळवण्यासाठी सिकंदरच्या सैन्याने मस्सक वर हल्ला चढवला परंतु मस्सक ची राणी कृपा याच्या नेतृत्वाखाली तेथील स्त्रियांनीही शस्त्र हाती घेऊन सिकंदरला कठोर प्रतिकार केला परंतु या सैन्या समोर त्यांचा निभाव लागला नाही ग्रीक लेखकांनी लिहून ठेवले आहे की सिकंदरच्या सैन्याने मस्सक च्या समस्त स्त्रियांना ठार मारले
या भीषण कृतीनंतर तक्षशिला नगरीचा राजा अभिनेतर यांनी सिकंदर समोर आत्मसमर्पण केले तो सिकंदरच्या मोहिमेत सामील झाला अशा प्रकारे काही स्थानिक राजे सिकंदर समोर आत्म समर्पण केले
पुढे सिकंदर हळूहळू भारत भूमी जिंकत पंजाब मध्ये येऊन पोहोचला
पंजाबच्या झेलम आणि चिनाव या दोन्ही नदीच्या भागात त्याकाळी पुरु राज्याची सत्ता होती पुरु राजाने सिकंदरच्या आत्मसमर्पणाच्या प्रस्तावाला धुडकावून लावले आणि सिकंदरला चेतावणी देत झेलम नदीच्या किनाऱ्यावर युद्धाचे आव्हान केले तिथे झालेल्या युद्धाला भारतात आपण झेलम युद्ध या नावाने ओळखतो
इमेज
या युद्धात पुरु राजाने सिकंदर चा प्रतिकार केला
सिकंदर या युद्धात जखमी झाला त्याचा घोडा मारला गेला परंतु विजय मात्र सिकंदरचाच झाला या युद्धाने सिकंदरच्या सैन्याचे बळ खचले होते व्यास नदीच्या किनाऱ्यावर पोहोचताच सिकंदरच्या सैन्याने नदी पार करण्यास नकार दिला नदीच्या पलीकडे मगध सम्राट धनानंद याची सत्ता होती संपूर्ण भारत जिंकण्या करता सिकंदरच्या सैन्याला अजूनही मागध च्या लाखोच्या पायदळच्या हजारोच्या घोड दलाच्या आणि शेकडो युद्ध कुशल हत्तीचा सामना करायचा होता
कदाचित यामुळे सिकंदरच्या सेनाने व्यास नदी पार करण्यास नकार दिला
या नदीच्या पश्चिमेला उभी असलेल्या सैन्याला उत्तेजित करण्याचा सिकंदरने भरपूर प्रयत्न केला परंतु नववर्षापासून युद्ध लढत असलेल्या आणि मातृभूमीपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या सैन्याचे मन सिकंदर वळवू शकला नाही
सिकंदरला आपली विश्वविजयाची मोहीम न जिंकताच माघार घ्यावी लागली
सिकंदर भारतात 19 महिने राहिला नंतर इसवी सन पूर्व 325 मध्ये तो ग्रीक कडे निघाला परंतु ही यात्रा त्याच्यासाठी दुर्दैवी ठरली कारण इसवी सन पूर्व 323 मध्ये बेबीलून पर्यंत पोहोचताच तो आजारी पडला या आजारात वयाच्या 33 व्या वर्षी मरण पावला त्याची विश्वविजया चे स्वप्न स्वप्नच राहिले
मित्रानो माहिती आवडल्यास कॉमेंट करा
भेटूया पुढील भागात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा