कलिंग चे युद्ध आणि सम्राट अशोक यांचा धर्म परिवर्तनाचा निर्णय भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे सम्राट अशोक आणि त्याचे कलिंग युद्धानंतरचे धर्म परिवर्तन
अशोक हा मौर्य साम्राज्याचा तिसरा राजा होता त्याच्या कारकीर्दीतील कलिंग
युद्धाने त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा दिली
इमेज
हे कलिंगचे युद्ध आणि त्यानंतरचा बौद्ध धर्माचा स्वीकार यामुळे अशोकला चक्रवर्ती सम्राट अशोक म्हणून ओळखले जाते
कलिंग युद्ध हे इसपू 261 मध्ये लढले गेले
मौर्य साम्राज्याच्या विस्ताराच्या काळात अशोकाने आपल्या आजोबांचा चंद्रगुप्त मौर्य आणि वडील बिंदुसार यांनी स्थापन केलेल्या साम्राज्यांचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला कलिंग हे तेव्हाचे राज्य आजच्या ओडिसा आणि आंध्र प्रदेशचा काही भाग म्हणून बनले होते
इमेज
हे एक शक्तिशाली आणि स्वतंत्र राज्य होते कलिंगडच्या भौगोलिक स्थान यामुळे आणि व्यापारी महत्वामुळे मौर्य साम्राज्यासाठी ते महत्त्वाचे होते
परंतु कलिंग च्या लोकांनी मोरयाचे अधिपत्य अस्वीकार केला ज्यामुळे युद्ध झाले कलिंग युद्ध हे अत्यंत रक्तरंजित ठरले अशोकाच्या शिलालेखानुसार सुमारे एक लाख लोक मारले गेले आणि दीड लाख लोकांना बंदी बनवण्यात आले . युद्धभूमीवर पसरलेली प्रचंड हानी मृतदेहाचा ढीग आणि लोकांचा आक्रोश यामुळे अशोकाच्या मनावर खोलवर परिणाम झाला
या युद्धाने त्याला मानवी जीवनाचे मूल्य आणि युद्धाची फालश्रुती याची जाणीव करून दिली या कलिंगचे युद्धानंतर अशोकला आपल्या हिंसक विजयाचा पश्चाताप झाला युद्धाच्या भयावह परिणामांनी त्याला अंतर्मुख केले आणि मग त्याने शांततेचा मार्ग शोधण्यास सुरुवात केला याच काळात त्याची भेट बौद्ध भिकू उपभोक्त यांच्याशी झाली बौद्ध धर्मातील अहिंसा करुणा आणि शांती या तत्त्वांनी अशोकाला प्रभावित केले
इमेज
त्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि जीवनात तसेच कारभारात या तत्त्वाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला
धर्म परिवर्तन नंतर अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी अनेक पावले उचलली त्यांनी शिलालेख आणि स्तंभलेख तयार करून लोकांना अहिंसेचा संदेश दिला त्यांनी आपल्या साम्राज्यात आणि प्रदेशात बौद्ध धर्म प्रचारक पाठवले त्यामुळे भारताबाहेरही हा धर्म पसरला श्रीलंका म्यानमार आणि इतर आशियाई देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार हा अशोकाच्या प्रयत्नाचे फळ मानले जाते
त्याने बौद्ध विहार आणि स्तूप बांधले ज्यापैकी सारनाथ येथील अशोक स्तंभ आणि सांची येथील स्तूप आजही प्रसिद्ध आहेत अशोकाने बौद्ध धर्माच्या तत्त्वावर आधारित राज्यकारभार केला त्याने प्रजेच्या कल्याणासाठी रस्ते विहिरी रुग्णालय आणि शाळा बांधल्या त्याने दास प्रथा आणि हिंसक प्रथावर बंदी घातली त्याच्या धर्मनितीमध्ये सर्व धर्माचा आदर पर्यावरण संरक्षण आणि प्राणी संरक्षण याचा समावेश होता अशोकाने प्रजेला अहिंसेचे पालन करण्यास प्रोत्साहित केले कलिंग युद्ध आणि अशोकाचे धर्म परिवर्तन
याचा भारतीय इतिहासावर खोल परिणाम झाला . अशोकाने युद्धाचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारला ज्यामुळे मौर्य साम्राज्याला स्थिरता मिळाली त्याचा धम्म हा केवळ धार्मिक संदेश नसून एक सामाजिक आणि नैतिक संहिता होती जी आजही प्रसंगिक आहे
भारताच्या राष्ट्रीय चिन्हात असलेला अशोक चक्र हा त्याच्या या वारसाचे प्रतीक आहे
इमेज
सुरुवातीला अशोक हा फक्त महत्त्वाकांक्षा सम्राट म्हणून ओळखला जात होता परंतु कलिंग युद्धानंतर त्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि अहिंसा शांती आणि प्रजेच्या कल्याणासाठी जीवन समर्पित केले या त्याच्यातील परिवर्तनामुळे त्याला प्रियदर्शी ही उपाधी मिळाली जी त्याच्या दयाळू आणि न्यायी शासनाचे प्रतीक बनले. कलिंग युद्ध हे अशोकच्या जीवनातील एक निर्णय वळण ठरले अशोकाचे धर्म परिवर्तन हे केवळ वैयक्तिक बदल नव्हते तर त्यांनी संपूर्ण समाजाला एक नवीन दिशा दिली त्याच्या शिकवणी आणि कार्यामुळे तो आजही महान सम्राट अशोक म्हणून स्मरणात राहतो त्याचा हा वारसा मानवतेसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे
मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा कमेंट करा
भेटूया लवकरच
जय भारत 🇮🇳
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा