औरंगजेब चा मृत्यू मुघल साम्राज्याची घसरण 20 फेब्रुवारी 1707 रोजी संपूर्ण हिंदुस्तान चा बादशाह असलेला औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीत अहमदनगरच्या गावाजवळ भिंगार या गावात मरण पावला
औरंगजेब मरण पावला तेव्हा त्याचं वय 89 वर्ष एवढं होतं म्हातार पण मुळे म्हणा किंवा उशिरा आलेला शहाणपणामुळे म्हणा आपल्या मरणानंतर आपल्या मुलाचे आपापसात भांडण होऊ नये असा त्याचा विचार होता पण जे पेरलं तेच उगवत असतं
स्वतः औरंगजेबाने स्वतःच्या भावाला व बापाला सोडलं नव्हतं त्याची मुलं तर वेगळे काय करणार औरंगजेबला तीन मुलं होती
1 शहजादा मोअज्जम 2 शहजादा आजम शहा आणि कांबक्ष
इमेज
औरंगजेबची इच्छा होती या तिन्ही मुलांनी आपली साम्राज्याची तीन तुकडे करावे आणि सुखाने नांदावे पण तसं झालं नाही औरंगजेब चा मृत्यू होतास पुढच्या पंधरा दिवसात त्यांचा मुलगा आजम शहा यांनी स्वतःला बादशहा घोषित केला इमेज
आणि तो दिल्लीच्या दिशेने निघाला आग्र्याजवळ येताच जिजाऊ नावाच्या गावाजवळ त्याची भेट शहजादा मोजम बरोबर झाली
20 जून 1707 रोजी झालेल्या या लढाईत शहजादा मोअजम आजामशहाचा पराभव केला आणि त्याचे तीन मुलं
1 बेदार बाक्त 2जवान बक्त आणि सिकंदर शान या तिघांची हत्या केली
अजून शहाजी बादशहाची हळद उतरायच्या अगोदरच त्याची बादशाही संपली होती आणि वंश देखील हे अगदी मोगली स्वभावाला धरूनच चालत होतं
शहजादा मोअजम पुढचा बादशाह झाला त्यांना आपलं नाव बदलून बहादूर शाह असं ठेवलं पुढे दीड वर्षानंतर 12 जानेवारी 1709 रोजी हैदराबाद जवळ झालेल्या लढाईत मोअजम आपल्या एकमेव जिवंत असलेला भाऊ काम्बक्ष्याचा पराभव केला व त्याची हत्या केली आपल्या मार्गावरील शेवटचा काटा दूर केला
मोअजम त्या मनाने दोघा भावापेक्षा तो सरस होता आग्रा काबुल लोहार तसेच दख्खनचा सुभेदार होण्याचा त्याचा मोठा अनुभव होता
मुघल दरबारात नाच गाण्याचा रिवाज त्यानेच चालू केला
लाल कुवर या आपल्या आवडत्या नर्तकी बरोबर सदा गुंग असायचा बादशहाला 11 महिन्यातच त्याच्या भावाचा मुलगा असलेला फारूक सियर आणि पकडले आणि त्याची हत्या केली यात फारूक सियर ला साथ देणारे सय्यद बंधूच होते पुढे चालून याच फारुख सियर ने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला संपूर्ण मुघल भारतामध्ये व्यापार करण्याचा परवाना दिला
साहेब बंधूंच्या जीवावर बादशहा झालेला हा फारूक सियर सय्यद बंधूला कटशह देण्याचा प्रयत्न करत होता सय्यद बंधूंनी मराठ्यांची मदत माहिती आतापर्यंत दिल्लीहून मुघलांचे सैन्य महाराष्ट्रावर येत होते पण आता बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली बाजीराव पेशवे खंडेराव दाभाडे यांच्या सह हजारो मराठ्यांचा एक पथक सय्यद हुसेन अली यांच्या बरोबर दिल्लीवर चालून गेला
इमेज
मराठ्यांनी फारूक सियर कडे दक्कनची चौथे आणि सर दशमुखी मागितली व संभाजी राजे यांची पत्नी महाराणी येसूबाई यांच्या सुटकेची पण फारुख सियर ने ही मागणी फेटाळली व मराठा वर दिल्लीतच हमला केला त्याच्या दुसऱ्या दिवशी सय्यद बंधूं बाळाजी विश्वनाथ व मराठा सैन्याने बादशहाच्या दरबारात घुसून खाली खेचले त्याचे डोळे काढले आणि त्याची अदब खान्यात रवानगी केली
मित्रानो जर का ही माहिती आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा भेटूया लवकरच दुसऱ्या भागात
जय भारत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा