महाजन पदाची ओळख
या भागात आपण पुढील महाजन पद पाहणार आहोत
7 वत्स्य महाजनपद
उत्तर प्रदेशातील प्रयाग जवळ असलेले वत्स्य किंवा वामा हे महाजन पद राज नियंत्रित महाजन पद होते याची राजधानी कौशम्बी होती इसवी सन पूर्व सातव्या शतकात राजा उदयन यांनी कौशम्बी नगराची
स्थापना केली या नगराने अनेक श्रीमंत व्यापाऱ्यांना आपल्याकडे आकर्षित केल्यामुळे कौशम्बी हे नगर दक्षिण आणि वायव्य कडून येणाऱ्या वस्तू चे प्रमुख केंद्र बनले होते
8 कुरु महाजन पद
कुरु महाजन पद सध्याच्या दिल्लीच्या आसपास असलेले महत्त्वाचे महाजन पद होते इंद्रप्रस्थ म्हणजे सध्याची दिल्ली ही त्याची राजधानी होती महाभारतात आपल्याला गुरु आणि कौरवांशी संबंधित घटनांचे वर्णन पहावयास मिळते
इमेज
इसविसन पूर्व चौथ्या शतकाच्या अखेरीस रचल्या गेलेल्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रात ही गुरु राज्य आणि तेथील राज अंशाची माहिती आपल्याला पहावयास मिळते
9 पांचाळ महाजन पद
पांचाळ हे राज्य कुरु राज्याच्या पूर्वेला गंगा नदी आणि हिमालय पर्वत रांगा यांच्यामध्ये वसलेले होते
इमेज
त्याची राजधानी अहिछत्र ही होती जी सध्या बरेली भागात असल्याचे दिसून येते प्राचीनकाळी पांचाळ हे राज्य दक्षिण पांचाळ आणि उत्तर पांचाळ असे दोन भागात विभागलेले होते पांचाळ हे एक शक्तिशाली महाजनपद होते परंतु मौर्य आणि गुप्त साम्राज्यांनी त्याला संपुष्टात आणले
10 सुरसेन महाजनपद
सुरसेन महाजन पद
इमेज
यमुना नदीच्या पश्चिमेस मत्स्य राज्याच्या पूर्वेच्या बाजूला असलेले होते येथील राजधानी मथुरा ही होती गौतम बुद्धाच्या काळात राजा सुरसेना ने बौद्ध धर्माचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती असे वर्णन बौद्ध ग्रंथामध्ये पाहावयास मिळते नंतरच्या काळात मात्र भरभराटीस आलेले हे शूरसेन राज्य मगध साम्राज्यात विलीन झाले
11 चेदी महाजन पद
चेदी राज्याचे वर्ण आपल्याला महाभारतातील पहावयास मिळते येथील शिशुपाल नावाचा राजा हा मगद आणि करू राजांचा मित्र होता त्याची राजधानी सुक्तीमती ही होती सुक्तिमती नगराची नेमके स्थान अद्याप ही ज्ञात झालेले नसले तरीही इतिहासकार हे नगर उत्तर प्रदेशातील सध्याच्या बांधा या प्रदेशा च्या आसपास असल्याचे मानतात
12 अवंती महाजन पद
अवंती महाजन पदे कोसल मगध आणि वत्स्य यांच्या बरोबरीचे चौथे महत्त्वाचे महाजन पद होते सध्याच्या मध्य प्रदेशात असलेले हे राज्य नर्मदा नदीमुळे दोन भागात विभागले गेलेले होते
इमेज
त्यापैकी उज्जैन हे उत्तर अवंतीची राजधानी तर माहेशमती दक्षिण अवंतीची राजधानी होती अवंती हे बौद्ध धर्माचे मोठे केंद्र होते मगध चा राजा शिशुनाग हा नंदीवनाचा पराभव केल्यानंतर अवंती ही मगध साम्राज्याचा भाग बनली
13 मत्स्य महाजन पद
मत्स्य महाजनपदे राजस्थान मधील जयपुर लगतच्या प्रदेशात असलेले महाजनपद होते हे राज्य कुरु राज्याच्या दक्षिणेस तर यमुना नदीच्या पश्चिमेस होते विराट नगर ही त्याची राजधानी होती मत्स्य राज्याचे वर्णन विविध बौद्ध ग्रंथांमध्ये महाजनपद असे केले असले तरी बुद्धाच्या काळापर्यंत त्याची राजकीय शक्ती बऱ्याचपैकी कमी झाली असल्याचे दिसून आले होते
14 अस्मक महाजन पद
अस्मक महाजन पद दक्षिण भारतात असलेले एकमेव महाजन पद होते त्याच्या राजधानीचे नाव पोटन किंवा पोटली असे होते त्याचे स्थान सध्याच्या आंध्र प्रदेशात असलेले आपल्याला दिसून येते अस्मक महापदाचे वर्णन अंगुत्तर नीकाय या प्राचीन बौद्ध ग्रंथात आपल्याला पहावयास मिळते
15 कंबोज महाजन पद
भारताबाहेर पाकिस्तान अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेले प्राचीन कंबर महाजनपदे हिंदुकुश पर्वतरांगेच्या दोन्ही बाजूला वसलेले होते
इमेज
त्याची राजधानी राजपूर होती जिला हटक असे हे संबोधले जात होते सम्राट अशोकाच्या काळात काही ग्रंथांमध्ये आपल्याला कांबोज राज्याचे वर्णन पहावयास मिळते
इमेज
16 गंधार महाजनपद
सध्याच्या पाकिस्तानात वसलेले गंगाधर हे महाजन पद प्राचीनकाळी शिक्षण आणि विद्वानासाठी जगभरात प्रसिद्ध होते तक्षशिला हे नगर या साम्राज्याची राजधानी होती जागतिक दरावर शिक्षणाचे प्रमुख केंद्र असलेल्या तक्षशिला विद्यापीठात जगभरात अनेक विद्वान येत असत
मित्रांनो ही पूर्ण 16 महाजन पदाची ओळख कशी वाटली कमेन्ट करून सांगा
भेटूया पुढल्या भागात आणखीन वेगळ्या माहिती सोबत
जय भारत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा